शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे कृषि विभागाच्या माध्यमातून शेती विषयक बाबींसाठी सब्सिडी दिली जाते. ही subsidy वस्तूच्या जवळपास मूळ किमतीच्या निम्या व काही अटी-शर्ती लागू करून दिली जाते. ही subsidy शेतकर्यांना अर्थसहाय्य म्हणुन दिली जाते. आपण इलेक्ट्रिक मोटरसाठी अर्ज करणार आहे. इलेक्ट्रिक मोटर या घटकासाठी तोच शेतकरी पात्र होण्याची शक्यता असते ज्याच्याकडे सातबार्यावर एखाद्या पाण्याच्या स्रोताची नोंद असते. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे 55% तर इतर शेतकऱ्यांसाठी 45% असा subsidy criteria आहे. जवळपास अर्ध्या किमतीत वस्तू पडते असे म्हणले तरी चालेल. अर्ज प्रक्रिया खूप सोपी आहे. आपण अर्ज स्वतःच्या मोबाइलमधून सुद्धा करू शकतो. अर्ज करण्याची प्रक्रिया online ठेवण्यात आली आहे. जर तुम्हाला form भरने जमत नसेल तर तुम्ही तुमच्या तालुक्यातील कृषि सहाय्यक किंवा csc centre यांची मदत घेऊ शकता. शेतकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया खूप सोपी व सोईस्कर बनवण्यात आली आहे, जेणेकरून कुठलाही शेतकरी सहजरीत्या अर्ज करू शकेल. निवड प्रक्रिया ही लॉटरी पद्धतीने होते, तुमचे न...