महाराष्ट्र राज्यामध्ये tractor खरेदीसाठी शेतकर्यांना अर्थसहाय्य म्हणुन subsidy दिली जाते. ही subsidy छोट्या tractor साठी 1 लाख तर मोठ्या tractor साठी जास्तीत जास्त 1.25 लाख असू शकते आणि ही रक्कम भविष्यात बदलूसुद्धा शकते. subsidy साठी तुम्हाला mahadbt वर अर्ज करावा लागतो. सध्या निवड प्रक्रिया ही लॉटरी पद्धतीने सुरू आहे. अर्ज केल्यानंतर जर तुमची निवड होत असेल तर तुम्हाला message द्वारे कळविण्यात येते. या निवड प्रक्रियेमध्ये थोडा वेळही लागु शकतो. तुमची निवड झाल्यानंतरच तुम्हाला subsidy देण्याची प्रोसेस सुरू होते. ही अर्ज प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे, सर्वप्रथम स्वतःच्या मोबाईलमधील chrome खोला. chrome open केल्यावर mahadbt farmer login type करून search करायचे. त्यानंतर तुम्हाला https://mahadbt.maharashtra.gov.in या पहिल्या संकेतस्थळावर click करायचे आहे. जर तुमचे या संकेतस्थळावर या अगोदर नोंदणी झालेली असेल तर पुढील इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे अर्जदार लॉगीन या पर्यायावर click करा. त्यानंतर पुढील इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे वापरकर्ता आयडी किंवा आधार क्...