Skip to main content

Posts

Showing posts with the label spray pump subsidy

सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप सब्सिडीसाठी मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा?

    शेतकर्‍यांना शेतीच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनातर्फे कृषि यंत्रणा सब्सिडीवर अर्थसहाय्य म्हणुन उपलब्ध करून दिली जाते. यांपैकी सध्या सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपाविषयी आपण मोबाइलवरुन ऑनलाईन अर्ज कसा करावा हे बघणार आहोत. या पंपाची रचना बॅटरी चलित पंपासारखीच असून, या पंपाला सौरप्लेट जोडलेली असते. या अगोदर शेतकर्‍यांना बॅटरी चलित पंप 100% सब्सिडी वर उपलब्ध करून देण्यात आला होता व आता सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपसुद्धा 100% सब्सिडीवर उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. ही अर्ज प्रक्रिया तुम्ही तुमच्या मोबाइलवरुन सुद्धा पूर्ण करू शकता. जर तुम्हाला अर्ज प्रक्रियेमध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही तुमच्या तालुक्यातील कृषि सहाय्यक किंवा csc centre शी contact करू शकता. लॉटरी प्रक्रियेमध्ये निवड झाल्यास message द्वारे कळविण्यात येते, त्यानंतर कागदपत्रे upload करून तुम्हाला योजनेचा लाभ दिला जातो. अधिक माहितीसाठी तुम्ही mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता. mahadbt farmer login या पर्यायावर click करून शेतीविषयक योजनेची माहिती घेऊ शकता. तसेच योजनेसाठी ...