चाफ कटर पशुपालनासाठी खूप उपयोगी मशीन आहे. या मशीनचा उपयोग जनावरांचा चारा बारीक करण्यासाठी होतो. पशुपालन व्यवसायाच्या विकासासाठी या चाफ कटर मशीनची महत्त्वाची भूमिका आहे. चाफ कटर मशीनला कुट्टी मशीन असे देखील म्हणतात. चाफ कटर मशीन सब्सिडीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा अर्ज mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करावा लागतो. त्यासाठी या पोर्टलवर सर्वप्रथम registration complete करावे लागते तरच अर्ज करता येतो. अर्ज प्रक्रिया ही शेतकर्यांना अगदी सोपी व सोईस्कर बनवण्यात आली आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती/ अल्पभूधारक शेतकरी व बहुभूधारक शेतकरी/ महिला शेतकरी यांना 50% सब्सिडीवर तर इतर शेतकऱ्यांसाठी 40% सब्सिडी आहे. हा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाइलवरुन किंवा तालुक्याच्या कृषि सहाय्यक यांच्याकडून किंवा csc centre वर जाऊन पूर्ण करू शकता. अर्ज केल्यानंतर निवड प्रक्रिया ही लॉटरी पद्धतीने होईल व या प्रक्रियेत थोडा वेळही लागु शकतो. तुमची निवड झाल्यास तुम्हाला message द्वारे कळविण्यात येईल व तुम्ही संकेतस्थळावर जाऊन तुमच्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकता. येथे तु...